पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे 16 केंद्रांवर “कोवॅक्सिन’ आणि 56 केंद्रांवर “कोविशील्ड’ची लस मिळणार आहे. “कोवॅक्सिन’ ही लस केवळ दुसरा डोस घेतलेल्यांनाच मिळणार असून, 10 मे आणि त्या आधी पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळणार आहे.
या लसीसाठी 60 टक्के बुकिंग आणि उरलेली 40 टक्के लस ही “ऑन दी स्पॉट’ येणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे. “कोविशील्ड’ लसीचेही तसेच असून, प्रथम प्राधान्य हे दुसरा डोस घेणाऱ्यांना असेल.
ज्यांनी 13 मार्चपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळेल. याशिवाय 60 टक्के लस ही 45 वर्षे वयापुढील नागरिकांसांठी पहिला डोस मिळेल.
ज्या 45 वर्षे वयापुढील नागरिकांनी 15 मार्चपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना शुक्रवारी लस मिळू शकणार आहे. 60 टक्के लस ही 45 वर्षे पुढील नागरिकांना पहिल्या डोससाठी दिली जाईल.
मात्र, यासाठी ऑनलाइन बुकिंग आवश्यक आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता त्याचे ऑनलाइन बुकिंग करता येऊ शकणार आहे. दरम्यान, शनिवारी लसींचा पुरवठा न झाल्याने रविवारी एकालाही लस मिळाली नाही.