बारामती – बारामती शहरात आणखी तिघांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. सूर्यनगरी येथील 24 वर्षीय तरुण देसाई इस्टेट येथील 18 वर्षीय तरुण व नांदेड जिल्ह्याती ३३ वर्षीय चालक असे तिघेजण कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे त.नांदेड जिल्ह्यातील चालक दोन दिवसापूर्वी बारामती येथे आला होता.
काल प्रतिक्षेत असलेल्या १० रुग्णांचे तपासणी अहवाल हाती आले. त्यामध्ये तीन रुग्ण कोरोना संक्रमित असल्याचे आढळले. आज एकूण 46 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते .त्यापैकी 28 निगेटिव्ह आले असून 18 नमुने यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे तो संध्याकाळी किंवा रात्री अपेक्षित आहे. असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनोज खोमणे यांनी स्पष्ट केले आहे. संपूर्ण शहरात लॉक डाऊन सुरू असून नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.