मोर पिसारा फुलवून नाचतानाचे नयनरम्य दृश्य

बेल्हे दि.१६ (रामदास सांगळे ): जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बांगरवाडीत सध्या मोर बागडताना दिसत आहेत.या परिसरात ३०० पेक्षा जास्त मोरांच वास्तव्य आहे.मोरांचा केकरव येथील नागरिकांना नेहमी ऐकायला मिळतो.निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या प्रतिपंढरपूर म्हणून ओळखला जाणारा श्री क्षेत्र गुप्त विठोबा मंदिर परिसर,पाटिल मळा,शिडी मळा त्याच बरोबर रानदेवी परिसर या ठिकाणी मोर नेहमी नागरिकांना पहावयास मिळतात.

आपण जी पाहत आहात ती दृश रानदेवी मंदिर परिसरातील आहे. गावातील बहुतेक ठिकाणी पाणी आणि धान्य मोरांसाठी ठेवले जाते. त्याची धान्याची व्यवस्था गावातील तसेच इतर गावातील दानशूर व्यक्ती कडून केली जाते. गावातील किशोर कदम,सुधाकर बांगर, ऋषीकेश फराटे, अक्षय कदम, अमोल बांगर तसेच नारायण सावन्त यांची मोरांची देखभाल करण्यासाठी मोठी मदत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.