Corona Update : रूग्णांना घरूनच आणावे लागत आहेत बेड

मेरठ – उत्तर प्रदेशातील मेरठमधील करोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या 14 हजारवर पोहचली आहे. त्यामुळेच येथील सर्वात मोठं सरकारी करोना केंद्र असणाऱ्या लाला लजपतराय मेडिकल कॉलमध्ये रुग्णांची गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की रुग्ण स्वत:च्या फोल्ड होणाऱ्या खाटा घेऊन येथे दाखल होत आहेत. या केंद्रामधील पंखे काम करत नसून, छताला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे आणि रुग्णांच्या खाटा अगदी शौचालयाच्या दारापर्यंत असल्याचे चित्र दिसत आहे.

दिल्लीमधील विद्यापिठामध्ये शिकणाऱ्या वशिष्ट शर्मा नावाच्या तरुण मुलाने माध्यमाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, या केंद्रामध्ये दाखल असणाऱ्या त्याच्या वडिलांसाठी कुटुंबियांनी स्वत: फोल्ड होणारी खाट केंद्रांत आणली. वॉर्डातील कॉरीडोअरमध्ये ठेवण्यात आलेल्या खाटेवर या मुलाचे वडील उपचार घेत आहेत. आम्ही आमची खाट आणली हे एका अर्थाने चांगले आहे. येथील परिस्थिती इतकी वाईट आहे की रुग्ण चादरी टाकून किंवा थेट जमीनीवरच झोपून उपचार घेत आहेत, असे तो म्हणाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.