मुंबई – सध्या देशासह राज्यात सुद्धा करोनाचा प्रभाव झपाट्यापे वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित सापडत आहे. अश्यातच आता करोनाचे सावट बॉलिवूडवर देखील पसरले आहे. पहिल्या लाटेतून वाचलेल्या अनेक कलाकारांना दुसऱ्या लाटेने मात्र तडाखा दिला आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि आमिर खान, मिलिंद सोमण, बप्पी लहरी, परेश रावल यांना काहीदिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती.
अश्यातच आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला करोना झाल्याचे समोर आले आहे. सध्या आलिया होम क्वारंटाइन आहे. आलियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत करोना चाचणी पॉजिटीव्हआल्याचे सांगितले आहे. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. तुम्ही देखील तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा..”{या आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.
View this post on Instagram