Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

बेटिंगमध्ये आंतरराष्ट्रीय बुकींचे नेटवर्क?

by प्रभात वृत्तसेवा
April 2, 2021 | 11:30 am
A A
देशात ‘सट्टेबाजी’ कायदेशीर करण्याचे संकेत

37 जणांना अटक; आणखी 25 आरोपी निष्पन्न, मान्यता नसलेल्या ऍपचा वापर

पिंपरी – गहुंजे येथे 26 मार्च रोजी झालेल्या भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटिंग घेणाऱ्या टोळीला तीन ठिकाणांहून पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींनी बेटिंगसाठी मान्यता नसलेल्या ऍपचा वापर केल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. तसेच आरोपी हे विविध राज्यांतील असून त्यांचे नेटवर्क आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुकींसोबत असण्याची शक्‍यता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वर्तविली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 37 जणांना अटक केली आहे. तसेच आणखी 25 आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू आहे.

चेतन जगदीश डावर (वय 27, रा. हिवरेनगर, नागपूर), बिपीनकुमार मणिलाल तन्ना (वय 52, रा. वर्सोवा पोलीस स्टेशन समोर, अंधेरी वेस्ट, मुंबई), राहुल अजय साखला (वय 27, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई), अजय वसंत शहा (वय 44, रा. गोरेगाव वेस्ट, मुंबई) या चार जणांना 29 मार्च रोजी अटक केली आहे. तर कार्तिक राजकुमार चावला (वय 28, रा. पटेलनगर, नवी दिल्ली), गोविंद राजेश मणिहार (वय 31, रा. नागपूर), गौरव हरीश वाघवा (वय 30, रा. सोनीपथ, हरियाणा), रेमंड सामुअल कयादो (वय 21, रा. गोवा), अमित सुभाष चौधरी (वय 25, रा. इंदोर, मध्य प्रदेश) आणि अन्य 28 जणांना पोलिसांनी 27 मार्च रोजी अटक केली आहे.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 मार्च रोजी भारत-इंग्लंड यांच्यात क्रिकेट सामना झाला. या क्रिकेट सामन्यावर भोपाळ येथील मुख्य बुकी भोलू आणि नागपूर येथील मुख्य बुकी चेतन उर्फ सोनुडावर यांच्यासाठी आरोपींनी पुण्यातील विविध भागांतून ऑनलाइन माध्यमातून बेटिंग घेतली. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मामुर्डी येथील एका बांधकाम साईटवर, घोरावडेश्‍वर डोंगरावर तसेच विमाननगर येथील एका हॉटेलवर कारवाई करून 33 जणांना अटक केली आहे.

पोलीस कारवाईसाठी गेले असता आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करून मुक्कामार देऊन दुखापत केली. तसेच पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 45 लाख 37 हजार 400 रुपयांचे 75 मोबाइल फोन, तीन लॅपटॉप, अत्याधुनिक कॅमेरे, दुर्बिणी, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला.

करोना साथ सुरू असल्याने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामने प्रेक्षकांशिवाय खेळविण्यात आले. मैदानात प्रेक्षक नसल्याने सर्व क्रिकेट प्रेमी टीव्ही आणि ऑनलाइन माध्यमातून क्रिकेट सामने पाहत होते. प्रत्यक्ष क्रिकेट सामना आणि त्याचे प्रक्षेपण यामध्ये सुमारे सहा मिनिटांचे अंतर असते. या अंतराचा फायदा घेऊन आरोपी त्यांच्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशनचा वापर करून त्याद्वारे बेटिंग घेत होते.

बेटिंग ऍप्लिकेशन तयार करणारे आणि त्यावर बेटिंग घेणारे यांचा एक गट असतो. तर प्रत्यक्षात सर्वसामान्य क्रीडाप्रेमी पैसे लावतात त्यांचा एक गट असतो. बेटिंग घेणाऱ्या लोकांची एक टीम क्रिकेटच्या प्रत्यक्ष सामन्यावर लक्ष ठेवून असते. तिथे घडणाऱ्या घडामोडीनुसार त्यांच्या ऍप्लिकेशन मधील सर्व व्यवहार बदलतात आणि बेटिंग घेणाऱ्या गटाला मोठा आर्थिक फायदा होतो. तर सर्वसामान्य नागरिक पैसे हरतात.

भारतात बेटिंग ऍप्लिकेशन बेकायदेशीर आहे. असे असताना हे आरोपी गहुंजे येथील स्टेडियमच्या बाजूला असलेल्या एका उंच इमारतीमध्ये आणि डोंगरावर बसले. तिथून ही मंडळी अत्याधुनिक कॅमेऱ्यातून क्रिकेट सामना पाहून त्याद्वारे त्यांच्या बेटिंग ऍपमधील आर्थिक गणिते फिरवत होते. आरोपींचा एक गट गहुंजे स्टेडियमच्या बाजूला असलेल्या एका उंच इमारतीत, एक गट घोरावडेश्‍वर डोंगरावर थांबून सामन्यावर लक्ष ठेवून होता. तर एक गट पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून यावर नियंत्रण ठेवत होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, उमेश लोंढे, हरीश माने, उपनिरीक्षक नंदकुमार कदम यांच्या पथकाने केली आहे.

13 ऍपचा वापर
या प्रकरणात एकूण 13 ऍप वापरले गेले असून त्यातील एका ऍपच्या मालक व डेव्हलपरला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच मुंबई आणि नागपूर येथील दोन मुख्य बुकिंग घेणाऱ्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे नागपूर, मुंबई, दिल्ली, हरियाणा, जयपूर, गोवा या शहरांतील बुकिंगपर्यंत पोहोचले आहेत. देशभरातील अन्य महत्त्वाच्या शहरातील बुकिंगची देखील नावे तपासात समोर आली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची लिंक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुकिंगशी असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Tags: bettingBetting appbetting on cricket matchBookinbookingIndia-England cricketpimpari newspolice commissioner

शिफारस केलेल्या बातम्या

“मंडळांना पाच वर्षांसाठी परवानगी द्या !”
पुणे

“मंडळांना पाच वर्षांसाठी परवानगी द्या !”

5 months ago
पुण्यात पॉक्‍सो कायद्याची कडक अमंलबजावणी करणार ! पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांची माहिती
पुणे

पुण्यात पॉक्‍सो कायद्याची कडक अमंलबजावणी करणार ! पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांची माहिती

6 months ago
संजय आरोरा दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त
Top News

संजय आरोरा दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त

6 months ago
यंदा साखरगाठींच्या मागणीत वाढ
latest-news

यंदा साखरगाठींच्या मागणीत वाढ

10 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट; कुठे आणि केव्हा….

राजकारण तापणार ! बीबीसी डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून ABVP कडून ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

फक्त एक रिपोर्ट…अन् गौतम अदानीचे झाले 48000 कोटींचे नुकसान

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

मुलाच्या आजारपणामुळे टेंशनमध्ये असलेल्या भाजप नेत्याने कुटुंबासह विष घेत केली ‘आत्महत्या’

Most Popular Today

Tags: bettingBetting appbetting on cricket matchBookinbookingIndia-England cricketpimpari newspolice commissioner

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!