लस घेतल्यावरही करोना होतो? किती आहे प्रमाण? 31 हजार जणांवर संशोधन करून एम्सने केलं स्पष्ट

नवी दिल्ली – करोनाचा नायनाट करण्यासाठी करोना प्रतिबंधक लसीकरण महत्वाचे असल्याचे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यानुसार जगभरात वेगाने लसीकरण मोहिम सुरु आहे. परंतु कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोना होतो का असा संशय अनेकांना आहे.

लस घेतल्यानंतरही काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असले तरीही ती संख्या अत्यल्प आहे. पण कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर कोरोना होतो की नाही यासाठी एक संशोधन करण्यात आले आहे आणि त्याचे निष्कर्ष अतिशय सकारात्मक आले आहेत.

यासाठी दिल्लीच्या एम्समध्ये तब्बल 31 हजार 600 आरोग्य कर्मचार्‍यांवर संशोधन करण्यात आले. सर्व कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस देण्यात आला होता. त्यापैकी 95 टक्के कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झालीच नाही असे तथ्य संशोधनातून समोर आले आहे. तर 4.28 टक्के कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले.

ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, त्यांच्या शरीरात लसीचा प्रभाव आयुष्यभर राहू शकतो असे सांगण्यात आले होते. म्हणजेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुमवत आहे त्यांच्यावर लसीचा परिणाम कमी झाल्याचे निदर्शनास आले.

लस दिल्यानंतर काही आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना झाल्याचे समोर आले. परंतु त्यात कुठल्याही कर्मचार्‍याचा मृत्यू झाला नाही, असेही या संशोधनातून समोर आले. त्यामुळे करोनाला रोखण्यासाठी सर्वांचे लसीकरण होणे महत्वाचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.