पुणे : कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपण घरातच थांबा. मनोरंजनासाठी वाचन करा. त्यातही वर्तमानपत्रांचे वाचन करा. वर्तमानपत्रांची निर्मिती पूर्णत: यांत्रिकीकरणाद्वारे होत असल्याने त्याद्वारे कोरोनाची लागण होण्याची सूतराम शक्यता नाही, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूंची बाधा जगभरातील सुमारे 200 देशांना झाली आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. तोंडाला हात लावण्यापुर्वी 20 सेंकद साध्या साबणाने हात धुवा. बाहेर पडू नका. जेवढे घरात थांबाल तेवढे कोरोनापासून दूर रहाल. मनोरंजनासाठी वाचन करा. मुख्य म्हणजे वर्तमानपत्राचे वाचन करा, असे डॉ. भोंडवे म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, वर्तमानपत्राची निर्मिती अद्यायवत यांत्रिकीकरणातून होत असते. त्यामुळे ते जंतूविहीन अवस्थेत बाहेर पडते, त्यामुळे वर्तमानद्वारे कोरोना पसरत नाही, असे आवर्जून सांगून आरोगय विषयक नियमांचे पालन करा, घरी रहा आणि कोरोनाला पराभूत करा असे आवाहन डॉ. भोंडवे यांनी केले.