निमोणे (पुणे) – शिंदोडी (ता. शिरूर) येथे करोनाचा शिरकाव झाला आहे. येथील एका 60 वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाली आहे.अशी माहिती निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी इंदिरा डॅनियल यांनी दिली.
या महिलेच्या संपर्कातील नागरिकांची माहिती काढण्याचे काम सध्या सुरू आहे. शिरुर तालुक्यातही अनेक गावांत करोनाचा शिरकाव झाला आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. गेले 6 महिने शिंदोडी गाव करोनामुक्त होते. परंतु शिंदोडी गावात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.