केडगाव -दौंड शहरातीलबाधितांचा आकडा वाढतच आहे. उच्चभ्रू वस्तीबरोबर झोपडपट्टीत देखील करोनाने शिरकाव केल्याने प्रशासन हतबल झाले आहे. काही बेफिकीर लोकांमुळेच हा प्रकार घडत असल्याचे आता नागरिक बोलत आहेत.
दौंड शहरात ये- जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काही लोक विनाकारण रस्त्यांवर गर्दी करीत आहेत. शहरासह काल पारगाव, हंडाळवाडी, सोनवडी, यवत, भरतगाव आदी गावांत रुग्ण आढळल्याने दौंड तालुक्यात आकडा वाढतच आहे. काल सापडलेल्या 9 रुग्णांमध्ये दौंडचे माजी नगराध्यक्ष आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचाही समावेश आहे.