भरमसाठ दर वाढीमुळे सोन्याला मागणी कमी

मुंबई – सध्या जागतिक बाजारात सोन्याचे दर जास्त आहेत. भारतामध्ये आयात सोन्यावर साडेबारा टक्के कर लागतो. त्यामुळे भारतातील सोन्याचे दर जागतिक दरापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे ग्राहकाकडून दागिन्यांची मागणी कमी झाली आहे.

परिणामी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दागिने उत्पादकांना प्रयत्न करावे लागत आहेत. एक्‍सचेंज ट्रेडेड फंड आणि गोल्ड बॉंड अशा सोन्यासंबंधित गुंतवणूक साधनाकडे लोकांचा ओढा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सोने आणि दागिने खरेदीला फारसा प्रतिसाद मिळत नाही. भारतात सोन्याचे दर 49 हजारांच्या पुढे गेले आहेत तर जागतिक पातळीवर सोन्याचे दर 1800 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेले आहेत.

भारतामध्ये सोने आयात करणाऱ्या कंपन्यांनी सोने विक्रीवर काही प्रमाणात सूट देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे थोडीफार तरी खरेदी होईल, असे वितरकांना वाटते. जागतिक पातळीवर चलन व शेअर बाजारात अस्थिरता आहे. त्यामुळे सोन्याचे मूल्य वाढत असल्याचे सांगण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.