4458 नवे बाधित : 43 जणांचा मृत्यू
पुणे – शहरात करोना रुग्णसंख्येने बुधवारीही उच्चांक गाठला. गेल्या चोवीस तासांत तब्बल 4 हजार 458 बाधितांची वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या वाढली असून, बुधवारी 3 हजार 374 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
मृतांची संख्याही वाढत चालली असून, बुधवारी 43 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील 11 मृत रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील सक्रीय करोना बाधितांची संख्या 33 हजार 858 झाली असून, त्यापैकी 799 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
आतापर्यंतची रुग्णसंख्या 2 लाख 69 हजार 343 झाली असून, त्यापैकी 2 लाख 30 हजार 183 रुग्ण बरे झाले आहेत. तर 5 हजार 302 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान मागील चोवीस तासांत 16 हजार 446 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.