गरवारे महाविद्यालयातही ‘करोना केअर सेंटर’

महापालिकेच्या आवाहनानंतर रा.स्व.संघाचे मदतकार्य

पुणे – महापालिकेच्या सहकार्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयात “करोना केअर सेंटर’ शुक्रवारपासून सुरू होणार आहे. यामध्ये दीडशे बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी याविषयी माहिती दिली. करोना केअर सेंटर सुरू करण्यासंबंधी महापालिकेने स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले होते. त्या हाकेला प्रतिसाद देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे सेंटर सुरू केले आहे.

सुमारे 150 बेडची सोय या ठिकाणी केली असून, जे करोना पॉझिटिव्ह आहेत परंतु त्यांना कोणतेही लक्षणे नाहीत अशा रुग्णांसाठी हे सेंटर सुरू केले आहे. यामध्ये जागा, बेड, रुग्णांचे नियोजन, स्वच्छता, रुग्णांचे खाण्या-पिण्याचे, औषधांचे वेळापत्रक, काढा देणे, जेवण, व्यायाम, प्राणायाम, समुपदेशन या सगळ्यांचे नियोजन आणि देखभाल संघ स्वयंसेवक करणार आहेत.

यामध्ये जेवण, नाश्‍ता आणि अन्य खान-पान सेवा पुरवणे, डॉक्‍टरांकडून नियमित तपासणी या गोष्टी महापालिका करणार आहे. या संस्थेनंतर एस. पी. कॉलेज, महर्षी कर्वी स्त्री शिक्षण संस्था याठिकाणी असे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये महिलांसाठीचे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

याशिवाय करोना चे टेस्टिंगही शुक्रवारपासून सुरू होणार असून, पु. ल. देशपांडे गार्डन येथे पहिले केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.