हनी ट्रॅपशी संबंधित सीडी जप्त; शस्त्रास्त्र कायद्या अंतर्गतही गुन्हा दाखल
इंदूर : येथील उद्योगपती आणि सांज लोकस्वामी या देनिकाचा मालक जितेंद्र सोनी उर्फ जीतु सोनी याच्या डान्सबारवर छापा टाकून 67 महिला आणि मुली आणि सात अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली. जितू सोनी आणि त्याचा मुलगा अमित यांच्यावर मानवी तस्करीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तेथे हनी ट्रॅप खटल्यासंदर्भातील कागदपत्रे सापडली आहेत. त्याचे पेनड्राइव्ह, सीडी यांसह 30 पेक्षा अधिक भूखंडाच्या खरेदीचे करार जप्त करण्यात आले आहेत.
सोनी याच्या घरातून 36 जिवंत लाडतुसे आणि सहा काडतुसांच्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्या त्याच्या परवानाधारक बंदुकीतील नसल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यानुसारही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राजकारणी आणि ज्येष्ठ नोकरशहांच्या हनीट्रॅपचे व्हिडिओ सोनीला मिळाले होते. त्यातील तपशील तो आपल्या दैनिकातून छापत असे.
याबाबत इंदूर महापालिकेचा निलंबित अभियंता हरभजन सिंग याने माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली शनिवारी गुन्हा नोंदवला होता. त्यावरून सोनीच्या मालमत्तांवर छापे घालण्यात आले. पोलिस त्याच्या बारमध्ये पोहोचण्यापुर्वी जितू सोनी पळून गेला. पोलिसांनी त्याच्या मुलाल अटक केली आहे.
पोलिसांनी रविवारी सांज लोकस्वामीचे कार्यालय पोलिसांनी सीलबंद केले. सोमवारी अमितला तपासासाठी लोकस्वामीच्या कार्यालयात आणण्यात आले. लवबकरच हे वर्तामनपत्र पुन्हा सुरू होईल, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.