सिंहगड घाटरस्ता एक जानेवारीपर्यंत बंद  

पुणे – पुणेकरांसह देशभरातून हजारोंच्या संख्येने पर्यटक सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करत असतात, मात्र यंदा त्यांना हा प्लॅन रद्द करावा लागणार आहे. कारण पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेता वनविभागाच्या वतीने गडावरील धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात गडावरील रस्त्यावर दरडी कोसळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक गडावर अडकून राहतात तसेच, गडावर जाणाऱ्या पर्यटकांना अडथळा निर्माण होतो.

दरम्यान, पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेता वनविभागाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही हे पाऊल उचलण्यात आले आहे. पुढील महिनाभर हे काम चालणार आहे. त्यामुळे २ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत गडावरील रस्ता पर्यटकांसाठी बंद असणारा आहे.

मागील वर्षी सुद्धा काही ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. परंतु दरड कोसळल्यामुळे काही जाळ्या निखळून पडल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा या जाळ्या बसण्याचे काम करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.