नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकात त्यांनी हिंदुत्वाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत कॉंग्रेसचेच ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी जाहीर असहमती दर्शवली आहे.
संबंधित पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इसिसशी करण्यात आली आहे. मात्र अशी तुलना करता येउ शकत नीा आणि हे चुकीचे आहे व अतिशयोक्ती असल्याचे, गुलाम नबी आझाद यांनी म्हटले.
वेगळी असलेली राजकीय विचारधारा म्हणून हिंदुत्वाशी आम्ही असहमत असलो, तरी इसिस आणि जिहादी इस्लामशी हिंदुत्वाची तुलना करणे हे वास्तवात चुकीचे आणि अतिशयोक्ती आहे, असे आझाद यांनी नमूद केले.
आझाद हे कॉंग्रेसच्या जी 23 गटाचे प्रमुख नेते आहेत. खुर्शीद यांनी अनेक प्रसंगी उघडपणे या गटावर टीका केली असून त्यांना गांधी घराण्याचे विश्वस्त मानले जाते.