Milind Deora : काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काही वेळापूर्वीच मिलिंद देवरा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
मागील काही दिवसांपासून देवरा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यातच त्यांनी केलेल्या ट्वीटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.विशेष म्हणजे देवरांच्या 10 माजी नगरसेवक आणि 25 पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Today marks the conclusion of a significant chapter in my political journey. I have tendered my resignation from the primary membership of @INCIndia, ending my family’s 55-year relationship with the party.
I am grateful to all leaders, colleagues & karyakartas for their…
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) January 14, 2024
मिलिंद देवरा यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर सांगितले की, “माझ्या राजकीय प्रवासाचा एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे. मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी लिहिले, “माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्ष जुने नाते संपुष्टात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अतुट पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा आभारी आहे.”
मिलिंद देवरा कोणत्या कारणामुळे नाराज?
माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याकरिता इच्छुक आहेत. परंतु महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत हे २०१४ आणि २०१९ साली या मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे मिलिंद देवरा यांना या मतदारसंघातून उमेदवार मिळणार नसल्याचे म्हंटले जात आहे. यामुळेच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जाण्याची चर्चा रंगली आहे.
मिलिंद देवरा यांचे 2004 आणि 2009 साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांचे वडील मुरली देवरा हे चार वेळा दक्षिण मुंबईतून खासदार झाले होते. त्यामुळे मुंबईच्या आणि दिल्लीच्या राजकारणात देवरा यांचे मोठे नाव आहे. त्यामुळे शिंदे गट देखील त्यांना देवरा यांना प्रवेश देण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.