नवी दिल्ली – लक्षद्विपमधील सद्य स्थितीबाबत तेथे जाऊन माहिती घेण्यासाठी कॉंग्रेस खासदारांचा एक गट तिकडे रवाना होणार होता, पण तेथील प्रशासनाने या गटाला लक्षद्विपमध्ये प्रवेश करण्यास अनुमती नाकारली आहे.
या भेटीमुळे हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून लक्षद्विपमधील शांतता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
लक्षद्विपमध्ये तेथील प्रशासनाने स्थानिक नागरिकांवर अघोरी नियम लावले असून त्यामुळे जनतेत मोठा असंतोष निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे खासदार हिबी इडेन, टी.एन प्रथपन आणि सी.आर. राकेश शर्मा यांच्या गटाने त्या भागाला भेट देण्याची योजना जाहीर केली होती.