नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशबरोबरच गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर न झाल्याविषयी कॉंग्रेसने ( Congress ) नापसंती व्यक्त केली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठ-मोठी आश्वासने देण्यासाठी आणि आणखी उद्घाटने करण्यासाठी अधिक वेळ मिळण्याची तजवीज त्यातून करण्यात आल्याचेही म्हटले.
गुजरातमधील निवडणूक जाहीर न करण्यात आल्याविषयी कॉंग्रेसचे ( Congress ) ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली. हिमाचलबरोबर गुजरातमधील निवडणूक जाहीर करण्यात आली नसल्याविषयी पक्षाला कुठलेही आश्चर्य वाटले नाही, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत हिमाचल निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
“राहुल कधीच मोदींशी बरोबरी करू शकत नाहीत”; महिला भाजप नेत्याचे वक्तव्य
त्यावेळी पत्रकारांनी गुजरात निवडणुकीची घोषणा न करण्याविषयी विचारले. त्यावर परंपरा, हवामान आणि मतदानासाठी पात्र तारखांचा विचार करण्यात आल्याचे उत्तर कुमार यांनी दिले. हिमवृष्टी सुरू होण्याआधी हिमाचलमध्ये निवडणूक व्हावी अशी आमची इच्छा आहे. हिमाचल विधानसभेची मुदत 8 जानेवारी 2023 ला संपणार आहे. तर, गुजरात विधानसभेची मुदत 18 फेब्रुवारी 2023 ला समाप्त होईल.
obviously this has been done to give more time to the PM to make some mega promises & carry out more inaugurations. Not at all surprising. https://t.co/LF1Vhw4WAw
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) October 14, 2022
दोन्ही विधानसभांच्या मुदत समाप्तीमधील अंतर 40 दिवसांचे आहे. नियमांनुसार एकत्रित निवडणुका घेण्यासाठी ते अंतर 30 दिवस असायला हवे, असे त्यांनी नमूद केले. मागील वेळी (2017) दोन्ही राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना जाहीर करण्यात आल्या होत्या. ती परंपरा यावेळी पाळण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.