- पिंपरी-चिंचवड शहरातील 20 खेळाडूंचा समावेश
पिंपरी – खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी होणाऱ्या हिवाळी स्पर्धा खेलो इंडियासाठी स्की अँड स्नोबोर्ड प्रशिक्षण व निवड चाचणीचे आयोजन केले आहे. स्की अँड स्नोबोर्ड महाराष्ट्र असोसिएशनच्या माध्यमातून पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील 20 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
जम्मू कश्मीर येथील गुलमर्ग येथे 28 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण व स्पर्धा चाचण्याचे आयोजन केले आहे. पहिली चॅम्पिअनशिप 5 फेब्रुवारीला होणार असून, यामध्ये वरिष्ठ व कनिष्ठ गटाचा समावेश आहे. नॅशनल स्की अँड स्नोबोर्ड 6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. वरिष्ठ गटाची निवड चाचणी स्पर्धा 11 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. यामध्ये 14 ते 21 वयोगटातील मुले, मुलींचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकूण 70 जणांची नोंदणी झाली आहे. यात पिंपरी-चिंचवड येथील 20 जणांचा समावेश आहे. इंटरनॅशनल स्की फेडरेशन व इंडियन ऑलॅम्पिक असोसिएशन प्रमाणित ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी 20 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.