पिंपरी (प्रतिनिधी) – इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून संगणक अभियंत्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ) दुपारी दोनच्या सुमारास वाकड येथे घडली. ते इन्फोसिस कंपनीमध्ये कामाला होते.
प्रसून कुमार झा (वय 28, रा. लॉरेल सोसायटी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसून हे हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामाला होते. ते मूळचे बिहार येथील असून मागील काही वर्षांपासून वाकड परिसरात राहत होते.
दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.