नवी दिल्ली: कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या दरम्यान दिल्लीमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. वसंत कुंज, दिल्ली येथील रहिवासी असलेल्या मुलाने वडिलांविरुध्द गुन्हा दाखल केला की, “माझे वडील लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत नाहीत. एवढेच नव्हे तर आमच्या वारंवार नकारानंतरही ते दररोज संध्याकाळी ८ वाजता घराबाहेर पडतात”, असे त्या मुलाने तक्रारीत म्हटले आहे.
मुलाच्या म्हणण्यानुसार, घरातील इतर सदस्यांनी बर्याच वेळा वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते कोणाचे ऐकत नाहीत. विशेष म्हणजे दिल्लीत कोरोनाव्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.
देशाची राजधानी दिल्लीत सक्रिय लोकांची संख्या केवळ २१९ वर पोहोचली आहे. भारतात कोविड -१९ मधील रुग्णांची संख्या २३०० च्या वर गेली आहे, तर ५६ जणांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे.