स्फोट झाल्यास गॅस कंपनीकडून भरपाई

५० लाखांपर्यंत मदतीबाबत जिल्ह्यातील ९० टक्‍के ग्राहक माहितीपासून अनभिज्ञ : जनजागृतीची गरज

दत्तात्रय गायकवाड

वाघोली – खूप वेळा ऐकलं असेल की गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन अनेकांनी जीव गमावला; पण गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर कंपनी 50 लाखांपर्यंतची नुकसानभरपाई देते. मात्र, ही माहितीच लोकांना ध्यानात नाही. याचा क्‍लेम कसा याबाबत जनजागृती झाली नसल्याने नागरिक अजून अनभिज्ञ आहेत. यासाठी जिल्ह्याभरात संबंधित कंपनी आणि सामाजिक स्वयंसेवी संस्थांकडून व्यापक प्रबोधनाची गरज अधोरेखित होत आहे.

गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी डिलर किंवा कंपनीची असते. हल्लीच एक घटना घडली तिथे एक सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. दुसरी महिला गंभीर जखमी झाली, तेव्हा न्यायालयाने मृत महिलेच्या कुटुंबाला 10 लाख 46 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली. जखमी महिलेला 1 लाखांची नुकसान भरपाई मिळाली.

प्रत्येक एलपीजी सिलिंडरसोबत असतो मोफत विमा, सर्व ग्राहक एलपीजी लाईफ इन्शुरन्सच्या अखत्यारीत येतात. या विम्यासाठी ग्राहकाला कुठलाही प्रिमिअम द्यावा लागत नाही. हा एक थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे. ज्या सर्वच पेट्रोलियम कंपन्या घेतात. हा विमा युनाइटेड इन्शुरन्स कंपनी देते. जो गॅस मिळताच सुरू होतो. एका माहितीनुसार या इन्शुरन्सला गेल्या 25 वर्षांत खूप कमी क्‍लेम केले आहे. 90 टक्‍के नागरिकांना याबाबत माहिती नसल्याचे मूळ कारण आहे.

या माहितीपासून नागरिक दूर आहेत. याला माहितीचा अभाव आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर 50 लाखांपर्यंतची नुकसान भरपाई मिळू शकते. ूाश्रसि.ळप या साईटनुसार जो कोणी व्यक्‍ती एलपीजी कनेक्‍शन घेतो, त्या सिलेंडरमुळे जर ती दुर्घटना झाली असेल तर ती व्यक्‍ती 50 लाखांपर्यंतच्या रकमेचा हक्‍कदार होऊ शकतो. सिलेंडरमुळे झालेल्या स्फोटामुळे जास्तीत जास्त 50 लाखांची नुकसान भरपाई आणि प्रत्येक व्यक्‍तीला 10 लाखांपर्यंतची नुकसान भरपाई मिळू शकते.

क्‍लेम करायची पद्धत
एलपीजी सिलिंडरचा विमा कव्हर मिळवण्यासाठी ग्राहकाला तत्काळ दुर्घटना होण्याची सूचना आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन आणि एलपीजी वितरकाला लिखित स्वरूपात द्यायची असते. या सूचनेसहित पोलीस ठाण्यातील एफआयआरची प्रत सुद्धा जोडावी लागते. मग तो गॅस वितरक ही माहिती कंपनीला पोचवतो. यानंतर कंपनीची एक टीम घराच्या झालेल्या नुकसानाचे आकलन करण्यासाठी येते.

ही टीम एक रिपोर्ट तयार करते. या रिपोर्टच्या आधारावर इन्शुरन्स क्‍लेमसाठी पात्र ठरतो. विमा कव्हर मिळविण्यासाठी तुमच्याकडे काही गोष्टी असणे आवश्‍यक आहेत. त्यामध्ये एफआयआरची कॉपी, जखमींच्या उपचारांच्या पावत्या, मेडिकल बिल, मृत्यू झाला असल्यास पोस्टमॉर्टम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र आदी कागदपत्रे तुमच्याजवळ आवश्‍यक आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)