Mahanagar Gas CNG Station| वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाली आहे. यातच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. महानगर गॅसने सीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत मंगळवारी 5 मार्च मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर कमी करण्यात आले आहेत. सीएनजीच्या दरांमध्ये प्रति किलो 2.5 रुपये कपात करण्याचा निर्णय महानगर गॅसने घेतला आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
सीएनजीचे नवे दर Mahanagar Gas CNG Station|
सीएनजीच्या दरांमध्ये प्रति किलो 2.5 रुपये कपात केल्याने मुंबईत महानगर गॅसचे सीएनजीची किंमत प्रति किलोग्रॅम 73.50 रुपये इतकी असणार आहे. ग्राहकांना नैसर्गिक वायूच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड कंपनीने गॅसच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सीएनजी गॅसच्या दर कपातीचा मोठा फायदा कार चालक आणि रिक्षा चालकांना होणार आहे.
पीएनजीच्या दरात कोणताही बदल नाही
सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली असली तरी दुसरीकडे पीएनजीच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याआधी ऑक्टोबर महिन्यात महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात केली होती. त्यावेळी सीएनजीचे दर 3 रुपये तर पीएनजीचे दर 2 रुपयांनी कमी करण्यात आले होते. त्यानंतर आता मुंबईत सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्यानुसार आता सीएनजीची किंमत प्रति किलोग्रॅम 73.50 रुपये असणार आहे. आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहे. Mahanagar Gas CNG Station|
हेही वाचा :
इस्रायलमध्ये एक भारतीय ठार ! हिज्बुल्लाहच्या रॉकेट हल्ल्यात अन्य दोघे जखमी