पुणे विद्यापीठातून आजपासून सीएनजी बससेवा सुरू

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सोमवारपासून (दि.29) विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मोफत सीएनजी बससेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठात मुख्य प्रवेशद्वारापासून मुख्य इमारतीकडे कामानिमित्त होणारी पायपीट थांबणार आहे. या बसव्यवस्थमुळे सर्वांची सोय होणार आहे.

विद्यापीठाला महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत दोन सीएनजी प्राप्त झाल्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यापीठाच्या आवारात विविध कामांसाठी येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना मोफत सेवा दिली जाणार आहे. विद्यापीठातर्फे पहिले तीन महिने प्रायोगिक तत्वावर मोफत बससेवा सुरू राहील. त्यानंतर शुल्काचा विचार केला जाणार आहे.

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सीएनजी बस पर्यावरण विभागाजवळून भौतिकशास्त्र, जयकर ग्रंथालय व अनिकेत कॅंटिन येथे थांबेल.त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळून सी-डॅकपासून संगणकशास्त्र विभागाजवळून परीक्षा विभागाजवळ थांबेल. परीक्षा विभागात जाणाऱ्या प्रवशांना सोडून सेट-भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रापासून मुख्य इमारतीजवळ जावून थांबेल. यानंतर बस विद्यापीठ आवारातील पोस्ट ऑफिस व मुलींच्या वसतिगृहाजवळ थांबून पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबणार आहे. दिवसभर याच मार्गाने बस सेवा सुरू राहील, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)