‘ये रे ये रे पैसा २’ चा धमाकेदार ट्रेलर लाँच

लंडननध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, उच्च निर्मितीमूल्य, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद… हे सगळं वर्णन हिंदी चित्रपटाचं नाही, तर ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या “ये रे ये रे पैसा २” या मराठी चित्रपटाचं आहे!

अमेय विनोद खोपकर प्रस्तुत आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. कर्ज बुडवून पळून गेलेला उद्योजक आणि त्याचा शोध घेणाऱ्या अण्णा आणि त्याचे अतरंगी साथीदार यांची गोष्ट “ये रे ये रे पैसा २” मध्ये पहायला मिळणार असल्याचं या ट्रेलरमधून दिसतं.

मात्र चित्रपटाच्या रंगतदार कथानकासह लक्ष वेधून घेतात ते खटकेबाज संवाद… अनेक टाळीबाज आणि पोटधरू हसायला लावणारे संवाद आणि प्रसंग ट्रेलरमध्ये दिसतात. तर आजपर्यंत मराठी चित्रपटात न दिसलेली भव्यता आणि चकचकीतपणाही या चित्रपटात आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीचं कुतूहल आता आणखीच वाढलं आहे.

या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)