नवी दिल्ली – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) उमेदवारांच्या निवडीबाबत आयोजित करण्यात आलेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत त्यांच्या मोबाइल फोनवर गेम खेळण्यात व्यस्त होते असा फोटो भाजप आयटीसेलने व्हायरल केला आहे. (bjp it cell) राज्यात आता कॉंग्रेस जिंकणार नाही याची खात्री झाल्यानेच त्यांचा अशा बैठकांमधला रस संपला आहे अशी टिप्पणी भाजपने (bjp) केली आहे. तथापि त्यावर भुपेश बघेल यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. (CM Bhupesh Baghel playing a mobile game) त्यांनी म्हटले आहे बैठकीच्या आधी मी मोबाइलवर कॅंडी क्रश खेळत असल्याचा फोटो त्यांना मिळाला आहे. पण मी नेहमीच मोबाइलवरचे आणि राज्यातील पारंपारीक खेळ खेळत असतो. मी पारंपारीक खेळ का खेळतो, राज्यात ऑलिम्पीक स्पर्धा का भरवतो असले आक्षेप ते नेहमीच घेत असतात. आता त्यांनी मी कॅन्डीक्रश (candycrush) का खेळतो म्हणूनही आक्षेप घ्यायला सुरूवात केली आहे. पण मी हे खेळ खेळतच राहणार आहे आणि कॅन्डीक्रशही मोबाइलवर खेळतच राहणार आहे. राज्यात कोणाला निवडून द्यायचे हे राज्यातील जनता ठरवणार आहे, भाजपला ते ठरवता येणार नाही असेही बघेल यांनी म्हटले आहे.
छत्तीसगड विधानसभा निवडणुका (Chhatisgadh widhansabha 2023) 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.त्या संबंधात कॉंग्रेसच्या सध्या बैठका सुरू आहे. राजधानी रायपूरमध्ये मंगळवारी रात्री पक्षाचे प्रदेश कार्यालय असलेल्या राजीव भवन येथे झालेल्या कॉंग्रेस स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत भुपेश बघेल मोबाईलवर हा खेळ खेळत बसल्याचा फोटो भाजप आयटीसेलने प्रसारीत केला आहे.
कॉंग्रेसच्या प्रदेश प्रभारी कुमारी सेलजा, प्रदेश अध्यक्ष दीपक बैज आणि इतर नेते बैठकीत दिसले तर स्क्रीनिंग समितीचे अध्यक्ष अजय माकन आणि इतर काही सदस्य या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.
भाजपच्या राष्ट्रीय आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit malviy) यांनी त्यांच्या एक्स हॅंडलवर हा फोटो टाकला असून त्यात त्यांनी लिहिले आहे, की छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल निश्चिंत आहेत कारण त्यांना माहित आहे की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे सरकार आता सरकार येणार नाही. त्यामुळे बघेल यांना कॅन्डी क्रश खेळणे योग्य वाटले असावे, असेही त्यांनी म्हटले आहे. पण बघेल यांनी त्यांच्या या पोस्टला महत्व न देता त्यांचाच खरपूस समाचार घेतला.