भोर – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे लातूर लोकसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक म्हणून भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.
लातूर येथील प्रदेश कॉंग्रेसची स्वानंद मंगल कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यावेळी आमदार संग्राम थोपटे यांचा लातूर कॉंग्रेसतर्फे सन्मान करण्यात आला. बैठकीत लातूर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघनिहाय विषयांवर आढावा घेण्यात आला.
बैठकीला माजी मंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, खासदार, आमदार, सर्व अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शहर अध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह सर्व सेलचे आजी- माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.