नवी दिल्ली- हिमाचल प्रदेशातील (Himachal pradesh) अनेक भागात पाऊस आणि बर्फवृष्टीनंतर मंगळवारी हवा स्वच्छ झाली, परंतु थंडी कायम आहे. राज्यात चार ठिकाणी किमान तापमान शून्याच्या खाली नोंदवण्यात आले आहे. तर दोन ठिकाणी ते शून्य अंश सेल्सिअसपर्यंत (himachal weather) घसरले आहे. केलॉन्गमधील किमान तापमान उणे ७.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. हिमवृष्टीनंतर राज्यातील आदिवासी भागात थंडीची लाट आली आहे. (himachal pradesh news)
गेल्या २४ तासांत कमाल तापमानातही लक्षणीय घट झाली आहे. कमाल तापमान सरासरी तापमानापेक्षा कमीच आहे. हवामान केंद्र शिमला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व भागात हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. सूर्यप्रकाशामुळे थंडीपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राजधानी शिमला आणि परिसरात आज हवामान स्वच्छ आहे. (himachal pradesh tempreture)
मनालीमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला
पर्यटननगरी मनालीमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टी आणि पुरामुळे खराब झालेले रस्ते यामुळे पर्यटक मनालीकडे वळत आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने मनालीमध्ये पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी तयारी सुरू केली आहे. मनालीत यंदा उन्हाळ्यातही पर्यटकांची संख्या खूपच कमी होती. सध्या दररोज सुमारे ६०० पर्यटक वाहने मनालीला पोहोचत आहेत. तर गेल्या आठवड्यात हा आकडा ४०० च्या जवळपास होता. (manali tourist)
हातू शिखरावर बर्फवृष्टी
त्याचवेळी बर्फवृष्टीनंतर नरकंडामध्ये पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बर्फवृष्टीनंतर नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी हॉटेल्समधील खोल्यांचे बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे. किन्नौर आणि लाहौल-स्पितीला जाणारे पर्यटकही नारकंडामध्ये एक दिवस मुक्काम करतात. साहसी क्रीडा संघटक रणजित डोगरा सांगतात की, येत्या काही दिवसांत मुसळधार बर्फवृष्टी झाली, तर स्कीइंगचा आनंद घेण्यासाठी नारकंडामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होईल.
असे आहे प्रमुख ठिकाणांचे तापमान (अंश सेल्सिअस)
शिमला +४.६
केलॉन्ग – ७.३
कल्पा – १.६
मनाली – ६.४
देहरागोपीपूर ०.०