BYJUS NEWS : देशातील सर्वात मोठे एज्युकेशन प्लॅटफॉर्म असलेल्या (Byjus) ची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कंपनीचे आर्थिक संकट सतत वाढत आहे. परिस्थिती अशी झाली आहे की बायजूकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसेही शिल्लक नाहीत. अशात बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन (BYJU Ravindran) यांनी त्यांचे घरही गहाण ठेवल्याचे समजते.
बायजूच्या कर्मचाऱ्यांचे पगार अडकले आहेत आणि कंपनी आर्थिक संकटात आहे. कर्मचार्यांना पगार मिळण्यास विलंब होत असताना, बायजू रवींद्रन यांनी कर्नाटकातील बेंगळुरू येथे त्यांचे घर गहाण ठेवून पैसे उभे केले आहेत, ज्यातून कर्मचार्यांना पगार दिला जाईल. बायजू या मोठ्या कंपनीचे आर्थिक संकट अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि त्यासोबतच कंपनीचा कर्ज देणाऱ्या संस्थांसोबत कायदेशीर लढाही सुरू आहे. (BYJU Ravindran House)
समोर आलेल्या माहितीनुसार, बायजू रवींद्रन यांच्याकडे बंगळुरूमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची दोन घरे आहेत आणि एप्सिलॉनमध्ये त्यांचा बांधकामाधीन व्हिला आहे.या मालमत्ता त्यांनी सुमारे 100 कोटी रुपये कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवल्या आहेत. यातून मिळालेली रक्कम कंपनीने थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड या मूळ कंपनीच्या १५ हजार कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी वापरली आहे. मात्र, या संदर्भात बायजूच्या व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कंपनी FEMA मुळे देखील अडचणीत
आर्थिक संकटात अडकलेल्या बायजूससाठी FEMA देखील नव्या समस्येला तोंड देत आहे. अलीकडेच, ईडीच्या तपासात उघड झाले आहे की कंपनीला 2011 ते 2023 या कालावधीत सुमारे 28,000 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) मिळाली आहे. कंपनीने याच कालावधीत थेट विदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली सुमारे 9,754 कोटी रुपये परदेशात पाठवले आहेत. या संदर्भात कंपनीच्या अनेक ठिकाणी झडती आणि जप्तीची कारवाईही करण्यात आली.