सिडनी, (ऑस्ट्रेलिया) : ऑस्ट्रेलियामध्ये भडकलेल्या वणव्यापासून बचाव करण्यासाठी मंगळवारी हजारो लोकांनी व्हिक्टोरिया राज्यातील एका किनाऱ्यावर आश्रय घेतला आहे. मल्लाकुटा शहरात, सकाळी इशारा देणारा सायरन वाजवण्यात आला. त्यानंतर सर्व रहिवासी समुद्र किनाऱ्यावर पळून गेले किंवा त्यांनी तटबंदीच्या घरात आश्रय घेतला. आग लागल्यामुळे शहरात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि वाऱ्याची दिशा बदलल्याने किनाऱ्यापासून दूर राहिली होती.
बचावाचा शेवटचा प्रयत्न म्हणून किनाऱ्यावर अग्निशामक कर्मचारी जमले होते. समुद्रकिनाऱ्यावर 4,000 लोक होते, असे व्हिक्टोरियाचे राज्य आपत्कालीन आयुक्त अँड्रयू क्रिस्प यांनी पत्रकारांना सांगितले.
संपर्क तुटलेल्या टाउनशिप्सला अन्न, पाणी आणि वीज उपलब्ध करुन देण्यासाठी नौदलाच्या जहाजांना बोलावले जाऊ शकते, असे व्हिक्टोरिया प्रीमियर, डॅनियल अँड्रयूज यांनी मंगळवारी सांगितले.
न्यूयॉर्क साऊथ वेल्समधील बॅटमेन्स बेपासून (एनएसडब्ल्यू) व्हिक्टोरियातील बैरन्सडेलपर्यंत सध्या ऑस्ट्रेलियाच्या दोन राज्यांमध्ये डझनभर ठिकाणी भडकलेल्या आगीने 500 किलोमीटरचा विस्तार केला आहे.