दिल्ली – जंतर मंतर मैदानावर मागील काही दिवसांपासून कुस्तीपटू हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपाप्रकरणी त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. मात्र काल बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कुस्तीपटू आणि पोलीसांमध्ये वाद झाला. यावेळी पोलिसांनी कुस्तीपटूंवर सौम्य लाठीचार्ज केल्याचेही सांगितले जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहून आता दिल्ली पोलिसांवर टीका केली जात आहे.
या व्हिडिओमध्ये खेळाडू बजरंग पुनिया आणि पोलीस यांच्यातील बाचाबाची झाली आहे. तसेच, कुस्तीपटू विनेश फोगट एका व्हिडीओमध्ये रडताना दिसत आहे. पावसामुळे ठिकठिकाणी काही बेड मागवण्यात आले होते, मात्र पोलीस त्यांना आणू देत नसल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला. महिला कुस्तीपटू विनेश फोगटने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याप्रकरणी तक्रार केली आहे. यात त्यांनी दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन आणि शिवीगाळ केल्याची तक्रार केली आहे.
VIDEO | Situation under control after heavy police deployment following an altercation at Delhi’s Jantar Mantar. pic.twitter.com/ZvfI4BP2dV
— Press Trust of India (@PTI_News) May 3, 2023
आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर पोलिसांनी जीवघेणा हल्ला करत धमकावल्याचे विनेश फोगाटने पत्रात म्हटलं आहे. याशिवाय विनेशने वरिष्ठ एसीपी धर्मेंद्र यांनी गैरवर्तन केल्याचाही आरोप केला असून सर्व पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
#WATCH दिल्ली: जंतर-मंतर पर प्रदर्शन कर रहे पहलवानों और दिल्ली पुलिस के बीच झड़प देखने को मिली। pic.twitter.com/sOnjpCZiqD
— ANI_HindiNews (@AHindinews) May 3, 2023
आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांनी दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंसोबत गैरवर्तन केले असून हे पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले आहे. मात्र याबाबत डीसीपी प्रणव तायल म्हणाले की, “जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या आंदोलनादरम्यान, आप नेते सोमनाथ भारती परवानगीशिवाय फोल्डिंग बेड घेऊन आंदोलनस्थळी आले. आम्ही मध्यस्थी केल्यावर आंदोलन करणारे कुस्तीपटू आक्रमक झाले आणि त्यांनी ट्रकमधील बेड काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर किरकोळ बाचाबाची झाली आणि सोमनाथ भारती यांच्यासह अन्य दोघांना ताब्यात घेतले.”
VIDEO | “The area is filled with water and there was no place to sleep, so we thought of bringing the cots…,” says wrestler Vinesh Phogat. pic.twitter.com/TWmqxdImlR
— Press Trust of India (@PTI_News) May 3, 2023