Punjab – सीमा सुरक्षा दलाने शनिवारी पंजाबच्या तरन तारण जिल्ह्यातील वान गावात एक ड्रोन जप्त केले. “बीएसएफ’च्या जवानांना शनिवारी दुपारी 4:40 च्या सुमारास सीमेवर गस्त घालत असताना वान गावाजवळील शेतात हे ड्रोन सापडले.
अलिकडच्या काळात, अशा ड्रोन आणि तस्करी करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत आणि पंजाब पोलिसांनी “बीएसएफ’च्या मदतीने असे अनेक प्रयत्न हाणून पाडले आहेत. यापूर्वी, 14 आणि 15 नोव्हेंबरच्या मध्यरात्री, बीएसएफने तरनतारन जिल्ह्यात आणखी एक चीन निर्मित पाकिस्तानी क्वाडकॉप्टर ड्रोन जप्त केला होता.