बीजिंग – चीनची लोकसंख्या 1961 पासून पहिल्यांदाच घटली आहे. लोकसंख्या मर्यादित ठेवण्यासाठी दीर्घकाळापासून करण्यात येत असलेल्या चिनी नेतृत्वाच्या प्रयत्नांना यश येत असल्याचेच हे निदर्शक आहे. चीनच्या लोकसंख्येचे प्रमाण घटत असल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे आता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून भारताचे नाव भविष्यकाळात पुढे येणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
2022 च्या अखेरीस चीनची लोकसंख्या 1,41,175 अब्ज एवढी होती. मात्र एका वर्षपूर्वी चीनची लोकसंख्या 1,41,260 अब्ज एवढी होती, असे चीनच्या राष्ट्रीय सांख्यकी ब्युरोने सांगितले. गेल्या वर्षीचा चीनचा जन्मदर 1000 व्यक्तींमागे 6.77 एवढा होता. मात्र त्यापूर्वी चीनचा राष्ट्रीय जन्मदर 1000 व्यक्तींमागे 7.52 जन्म इतका होता. त्यामुळे 2022 चा जन्मदर आतापर्यंतचा सर्वात खालावलेला जन्मदर ठरला आहे.
चीनमदील मृत्यूदर देखील 2021 मध्ये सर्वादिक नोंदवला गेला आहे. प्रति 1000 व्यक्तींमागे चीनमध्ये 7.37 इतक्या व्यक्तींचा मॉत्यू झाल्याची नोंद झाली होती. मात्र 2021 मध्ये हाच मृत्यूदर 7.18 मृत्यू इतका होता. चीनच्या लोकसंख्यामध्ये अचानक एवढी घट ही दीर्घकाळापासून लागू केल्या गेलेल्या एक-अपत्य धोरणामुळेच शक्य झाली आहे. हे धोरण चीनमध्ये 1985 पासून 2015 पर्यंत लागू केले गेले होते. याशिवाय चीनमधील शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढल्यामुळे अनेक अपत्यांनी एकापेक्षा अधिक अपत्य जन्माला घातली नाहीत. कित्येकांनी तर एकही अपत्य होऊ दिले नव्हते.
चीनमध्ये तीन वर्षांपासून “झिरो कोविड’ दोरणाची अंमलबजावणी केली जात होती. अलिकडेच हे धोरण अचानक मागे घेतले गेले आहे. हे धोरण मागे घेतले गेल्यामुळे अचानक आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येऊ लागला आहे. त्यामुळे मृत्यू वाढल्यामुळेही लोकसंख्येच्या प्रमाणावर मोठा परिणाम झाला आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
“एक अपत्य’धोरण मागे घेतल्यानंतर आता स्थानिक सरकारांकडून चिनी दाम्प्÷यांना मूल जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन दिले जाऊ लागले आहे. एकापेक्षा अधिक अपत्ये जन्माला घालण्यासाठी कर सवलती, गरोदरपणासाठीची दीर्घ मुदतीची रजा आणि घरासाटीच्या अनुदानाचीही भर घालण्यात आली आहे. मात्र या सुविधा दीर्घकाळापर्यंत सुरू ठेवल्या जाण्याची शक्यता नाही.