नवी दिल्ली- जानेवारी – सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) निवृत्त महासंचालक पंकजकुमार सिंह यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1988 बॅचमधील राजस्थान केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे.
ते 31 डिसेंबर 2022 रोजी बीएसएफ प्रमुख म्हणून निवृत्त झाले होते. त्यांचे वडील आणि 1959च्या बॅचचे निवृत्त आयपीएस अधिकारी प्रकाश सिंह यांनीही जून 1993 ते जानेवारी 1994 या कालावधीत बीएसएफचे प्रमुखपद भूषवले होते. प्रकाश सिंह हे देशातील पोलीस सुधारणांचे शिल्पकार मानले जातात.