चंडिगढ – पंजाबचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते चरणजितसिंग चन्नी यांचे बंधू मनोहर सिंग यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न दिल्याने मनोहर अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.
पंजाबमधील बस्सी पठाना मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी मनोहर प्रयत्नशील होते. मात्र, पक्षाने विद्यमान आमदारालाच उमेदवार म्हणून पसंती दिली. त्यामुळे मनोहर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
आपली उमेदवारी म्हणजे कुठले बंड नाही. मतदारसंघातील जनतेच्या इच्छेवरून निवडणूक लढवत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आता चन्नी त्यांचे मन वळवणार का, याविषयी उत्सुकता आहे. पंजाबमध्ये एका कुटूंबात एकच तिकीट देण्याचे धोरण कॉंग्रेसने अवलंबले आहे.