चिदंबरम यांच्या जामीनावरील निर्णय सर्वोच्च न्यायलयाने राखून ठेवला

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायलयाने जामीन फेटाळण्याच्या दिलेल्या निकालाविरोधात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायलयाने राखून ठेवला.

दरम्यान, चिदंबरम, त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम आणि काही कंपन्यांसह 15 जणांविरोधात आरोपपत्र सादर करण्यात आल्याची माहिती सीबीआयने शुक्रवारी न्यायलयात दिली. दरम्यान, न्या. ओ. भानुमथी यांच्या खंडपीठाला सीबीआयच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती दिली. त्यांनी चिदंबरम यांच्या जामीनाला विरोध केला. देशाला भ्रष्टाचाराबाबत झीरो टॉलरन्स स्वीकारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

चिदंबरम यांच्या चौकशीतून त्यांनी फसवणूक केल्याचा गुन्हाही पुढे येत आहे. या प्रकरणाची आणखी चौकशी करायची आहे. आणखी एका प्रकरणात त्यांची चौकशी करायची आहे, असे सीबीआयने न्यायलयात सांगितले. चिदंबरम यांच्या उपस्थितीमुळे या गुन्ह्यातील साक्षिदारांवर प्रभाव पडला जाऊ शकतो. त्यामुळे किमान त्या साक्षिदारांची उलट तपासणी होईपयइंत तरी त्यांना जामीन दिला जाऊ नये, असे मेहता म्हणाले. मेहता यांच्या युक्तीवादावर चिदंबरम यांच्या वकीलांनी जोरदार आक्षेप घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.