मांजरी गावठाण, महादेवनगर, मगर कॉलेज परिसरात महाआघाडीस जोरदार प्रतिसाद
मांजरी – गेली पाच वर्षे फक्त हडपसर विधानसभा मतदारसंघातील जनता विकासाच्या गप्पाच ऐकते आहे. भाजप सरकारचे फक्त मोठमोठे विकासाचे दावे करणारी जाहिरातबाजी, खोटी आमिषे यांना आता सुज्ञ मतदार बळी पडणार नाही. मी बोलणाऱ्यांपैकी नाही, तर करून दाखवणाऱ्यांपैकी एक आहे आणि इथल्या जनतेला त्याचा अनुभव आहे. मी हडपसरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू असून जनसामान्यांचा उत्तम प्रतिसाद त्यांना मिळत आहे. आज अण्णासाहेब मगर कॉलेज, सुभाष सोसायटी, महादेवनगर, घुले वस्ती, गोपाळपट्टी, बेल्हेकर वस्ती, चारवाडा, अनाजी वस्ती, व्हीएसआय रोड, मांजरी गावठाण व परिसरात त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदारांशी संवाद साधला.
यावेळी सुरेशअण्णा घुले, दिलीप घुले, प्रशांत घुले, अंकुश घुले, अजिंक्य घुले, नीलेश घुले, रमेश घुले, नंदू घुले, मंगेश तुपे (पाटील), संदीप तुपे, रोहिणी ताई तुपे, रामदास घुले, राहुल घुले, शिवाजी खलसे, दिलीप टकले, रवींद्र गोगावले, श्रीपाद घुले, समीर घुले, सागर बत्ताले, नेहाताई बत्ताले, जयश्रीताई खलसे, सुधीर घुले, सचिन टकले, सुनील घुले, संजय घुले, योगेश टकले, सुनील घुले, राजेंद्र गारुडकर, विनय घुले, संतोष घुले व आदी उपस्थित होते.
विकास हवा तर सक्षम, सुशिक्षित आणि समाजकारणास धरून विकासाभिमुख राजकारण करणारे नेतृत्व हवे अशी भावना इथल्या जनतेने व्यक्त केली आहे. शहरालगतची गावठाण, वाड्या-वस्त्या यांना उत्तम पायाभूत सुविधा, भविष्याचा विचार करून पाण्याचे नियोजन करणे यासारखे अनेक मुद्दे यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. त्यासाठी महाआघाडीच्या उमेदवारास मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेशअण्णा घुले यांनी केले.