चेन्नई – भारताच्या ‘अ’ बुद्धिबळ संघाने महिला गटात फ्रान्सवर विजय प्राप्त केला. येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला संमिश्र यश मिळत आहे. महिला गटात भारताच्या ‘अ’ संघाच्या विजयात पुन्हा स्टार खेळाडू तानिया सचदेवने वर्चस्व राखत फ्रान्सवर 2.5-1.5 अशा गुणफरकाने पराभूत केले.
अव्वल खेळाडू कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि आर. वैशाली यांनी आपापल्या लढती बरोबरीत सोडवल्या. भारत-ब संघाने जॉर्जियाकडून 3-0 असा पराभव पत्करला. तर भारत-क संघाने ब्राझिलशी 2-2 अशी बरोबरी साधली.
त्यापूर्वी, भारताचा ग्रॅण्डमास्टर डी. गुकेशने पाचव्या फेरीत ऍलेक्सी शिरोव्हवर सनसनाटी विजय मिळवला. या जोरावर भारत ब संघाने खुल्या गटात स्पेनला 2.5-1.5 असे पराभूत केले.
मात्र, आर. प्रज्ञानंदचा संतोस लॅटसाकडून पराभव झाल्यामुळे कामगिरी गुणतालिकेत खालावली होती. त्यानंतर भारत अ आणि भारत क संघांनी अनुक्रमे रोमानिया आणि चिली संघांवर 2.5-1.5 अशा फरकाने विजय मिळवले व स्पर्धेतील आव्हान कायम राखले.