Noida crime : उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरात मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये कुत्र्यांसाठी भांडणाची प्रकरणे रोज समोर येत आहेत. या मालिकेत आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे कुत्र्यावरुन एक महिला आणि निवृत्त आयएएस अधिकारी यांच्यात हाणामारी झाली. मात्र, नंतर महिलेचा पती माजी आयएएस अधिकाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे.
कुत्ता पालो… लेकिन खुद कुत्ता मत बनो
नोएडा में लिफ्ट में कुत्ते को ले जाने के लिए एक रिटायर्ड आईएएस अधिकारी आरपी गुप्ता पर एक महिला ने हमला बोल दिया दोनों के बीच में हाथापाई हुई…
महिला कुत्ते को सबसे लिफ्ट से ले जाना चाहती थी इसी बात से विवाद हुआ ..
PARK LAUREATE… pic.twitter.com/r6I9lMQXFm
— Sarita Kaushik (@SaritaKaushik05) October 31, 2023
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना सेक्टर-108 येथील पार्क लॉरेट सोसायटीत घडली. दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार झाल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेला कुत्र्याला लिफ्टमध्ये सोबत घेऊन जायचे होते.
निवृत्त आयएएस अधिकारी कुत्र्याला लिफ्टमध्ये जाऊ देण्यास नकार देत होते. यावेळी दोघांमध्ये वादसुरु झाला आणि हा वाद इतका वाढला की हाणामारी झाली. महिलेने निवृत्त आयएएसचा मोबाईल हिसकावला. यानंतर वाद वाढत गेला अन् निवृत्त आयएएस महिलेला चापट मारली. त्यानंतर काही वेळ दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि काही वेळाने महिलेचा पती लिफ्टमध्ये येतो आणि निवृत्त आयएएसशी वाद घालतांना दिसत आहे.
मारहाणीची माहिती मिळताच कोतवाली सेक्टर-39 पोलिस ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ तसेच सोसायटीत बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, नंतर दोन्ही पक्षांमध्ये लेखी करार झाला.
या घटनेबाबत पोलिस आयुक्त गौतम बुद्ध नगर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केले आणि लिहिले, ‘लिफ्टमध्ये कुत्र्याला नेण्यावरून वाद झाला आहे. दोन्ही पक्षांशी बोलणी सुरू असून, एसीपी-१ नोएडा माया पोलिस ठाण्याचे प्रभारी घटनास्थळी आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली असून, सीसीटीव्हीची नजर आहे. चौकशीनंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल.’ असेही सांगितले.