मोहरमनिमित्त आज वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे – मोहरमनिमित्त शहरात मंगळवारी (दि.10) ठिकठिकाणी ताबूत, पंजे, छबिने आदींच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह कॅम्प, खडकी परिसरात स्थानिक मिरवणुकीच्या वेळेनुसार वाहतूक बदल करण्यात आला असून वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

मुख्य मिरवणूक मार्ग
मोहरमनिमित्त होणारी मुख्य मिरवणूक पर्वती, सावरकर चौक, बजाज चौक, फडगेट पोलीस चौकी, पानघंटी चौक, संत कबीर चौक मार्गे पॉवर हाउस चौक, मालधक्का चौक, शाहीर अमर शेख चौक, कुंभार वेस चौक, परत शाहीर अमर शेख चौक, आरटीओ चौक या मार्गे जाऊन संगमघाट येथे विसर्जन होणार आहे.

लष्कर भागातील मिरवणूक
लष्कर भागातील मिरवणूक ताबूत स्ट्रीट येथून दुपारी 12.00 वाजता सुरू होणार आहे. बाटलीवाला बगीचा, दस्तुर मेहेर रोड, सरबतवाला चौक, बाबाजान दर्गा, भोपळे चौक, महात्मा गांधी रस्ता, कोहिनूर चौक, भगवान महावीर चौक, नाझ हॉटेल चौक, डावीकडे बुटी स्ट्रीटने पुन्हा बाटलीवाला बगीचा चौक येथे दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास धार्मिक विधीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर तेथून नेहरू मेमोरियल हॉल, समर्थ पोलिस ठाण्यामार्गे पॉवर हाउस चौकातून मुख्य मिरवणूकीच्या मार्गेच जाणार आहे. आरटीओ चौक संगम पुलावर विसर्जन होईल.

खडकी येथील मिरवणूक
लष्कर परिसरात इमामवाडा येथून सकाळी साडेदहा वाजता आणि खडकी परिसरात सायंकाळी 4 वाजता मिरवणूक होणार असल्याने वाहतूक बदल करण्यात आला आहे. या कालावधीत मिरवणूक मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी बंद अथवा वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.