रेल्वे आरक्षण खिडक्‍यांच्या वेळापत्रकात बदल

पुणे – प्रवाशांना आरक्षण करणे सोयीचे जावे, यासाठी रेल्वेने विविध परिसरांमध्ये आरक्षण केंद्रे उभारली आहेत. मात्र, आता दुपारी 2 नंतर सुरू राहणाऱ्या काही आरक्षण खिडक्‍यांमधील एक खिडकी बंद ठेवण्यात येणार आहे.

रेल्वेची कॅम्प, रविवार पेठ, शंकरशेठ रोड आणि डेक्कन येथे आरक्षण केंद्रे आहेत. ही केंद्रांच्या सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रत्येकी तीन खिडक्‍या सुरू असतात. मात्र, या केंद्रांवरील दुपारी सव्वादोन ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या खिडक्‍यांच्या नियोजनामध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार प्रत्येक आरक्षण केंद्रावरील एक खिडकी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापुढे शंकरशेठ रोड, डेक्कन, रविवार पेठ येथे दुपारी 2.15 ते रात्री 8 वाजेदरम्यान 3 खिडक्‍यांऐवजी 2 खिडक्‍या आणि कॅम्प येथील आरक्षण केंद्रात यापुढे 2 खिडक्‍यांऐवजी 1 आरक्षण खिडकी सुरू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)