तांत्रिक कामांमुळे रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल

पुणे – मुंबई विभागातील मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान होणाऱ्या तांत्रिक कामांमुळे रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. तर काही गाड्या मुंबई-पुणे-मुंबई रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून देण्यात आली.

कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्‍स्प्रेस दि. 15 ते 20 ऑक्‍टोबर या कालावधीत पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. तर, मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्‍स्प्रेस पुणे स्थानकातून सुटणार आहे.

हुबळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस (कुर्ला) दि. 15 ते 20 ऑक्‍टोबर या कालावधीत पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुबळी एक्‍स्प्रेस पुणे स्थानकातून सुटणार आहे.

हैद्राबाद ते मुंबई एक्‍स्प्रेस दि. 16 ते 20 ऑक्‍टोबर या कालावधीत पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. तर मुंबई ते हैद्राबाद एक्‍स्प्रेस पुणे स्थानकातून सुटणार आहे. विशाखापट्टणम ते एलटीटी एक्‍स्प्रेस दि. 15 ते 19 ऑक्‍टोबर या कालावधीत पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. तर एलटीटी ते विशाखापट्टणम एक्‍स्प्रेस पुणे स्थानकातून सुटणार आहे.

नांदेड ते पनवेल एक्‍स्प्रेस दि. 16, 17, 18 आणि 20 ऑक्‍टोबर रोजी पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. तर पनवेल ते नांदेड एक्‍स्प्रेस दि. 17, 18, 19 आणि 21 ऑक्‍टोबर रोजी पुणे स्थानकातून सुटणार आहे. पुणे-भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस दि. 15 ते 20 ऑक्‍टोबर या कालावधीत दौंड-मनमाडमार्गे धावणार आहे.

रद्द होणाऱ्या गाड्या
मुंबई-पंढरपूर-मुंबई फास्ट पॅसेंजर, मुंबई-विजापूर-मुंबई या गाड्यांसह दि. 19 रोजी सुटणारी नांदेड-पनवेल विशेष गाडी, दि. 20 रोजी सुटणारी पनवेल-नांदेड विशेष गाडी रद्द करण्यात येणार आहे.

प्रगती एक्‍स्प्रेस पुन्हा रद्द
मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्‍स्प्रेस दि. 16 ते 20 ऑक्‍टोबर या कालावधीत रद्द करण्यात येणार आहे. या गाडीतून रोज शेकडो नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक ये-जा करतात. रेल्वे प्रशासनाने गाडी रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.