चांद्रयान-२ : ‘या’ गाण्याद्वारे केला इस्रोच्या शास्त्रज्ञांना सलाम 

बेंगळूरु – अवघ्या जगाचे लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी ‘चांद्रयान-२′ मोहीमेत चंद्राच्या २.१ किलोमीटरवर लॅण्डिंग करताना शेवटच्या क्षणी विक्रमचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे देशभरातून कौतुक होत आहे. आता शास्त्रज्ञांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक गाणेही तयार करण्यात आले आहे. ‘तिरंगा लहराएंगे’ या शीर्षकाखाली हे गाणे तयार करण्यात आले आहे. या गाण्याला चांद्रयान अँथम म्हंटले आहे. हे गाणे श्रीकांत सुरफीरा बँडने तयार केले आहे. या व्हिडिओमध्ये गायक कैलास खैरही दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.