पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मध्य महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाढलेला उन्हाचा चटका कमी होईल. दरम्यान, पुणे शहरात दुपारनंतर हलका पाऊस, तर काही भागांत गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरावरून येणारऱ्या आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि मराठवाडा, विदर्भातील काही भागांत विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. कोकण-गोव्यातील ठाणे, रायगड भागात हलका पाऊस पडेल.
मध्य महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडेल. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांत पाऊस पडेल. 2 आणि 3 मार्चला छत्रपती संभाजीनगर भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातही अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. महानिरिक्षक हिरालाल सोनवणे.