Bharat Ganeshpure New Serial| ‘चला हवा येऊ द्या’ या शोने मागील काही वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सूत्रसंचालक डॉ निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे या कलाकार मंडळीच्या विनोदी शैलीने सर्वांनाच वेड लावले होते. मात्र या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने सर्व कलाकार मंडळी वेगवेगळ्या शोमध्ये काम करताना पाहायला मिळत आहे.
निलेश आणि भाऊ कदम हे एका कॉमेडी शोमध्ये पाहायला मिळत आहे. तर कुशल बद्रिके हिंदी कॉमेडी शोमध्ये यातच आता भारत गणेशपुरेची एका मालिकेत झळकणार आहे. भारत गणेशपुरेची झी मराठीवरील ‘शिवा’ या नव्या मालिकेत एन्ट्री झाली आहे. नुकताच त्यांच्या एन्ट्रीचा प्रोमोही समोर आला आहे. Bharat Ganeshpure New Serial|
View this post on Instagram
या मालिकेत भारत गणेशपुरे डॅशिंग अंदाजात दिसत आहेत. ‘शिवा’ ही मालिका गेल्या महिन्यातच सुरु झाली असून यात पूर्वा गोखले शिवा ही मुख्य भूमिका साकारत आहे. नवीन प्रोमोनुसार, आशुतोषच्या भूमिकेत असलेला शाल्व किंजवडेकर आणि शिवा दोघंही एक प्लॅन आखतात आणि इनकम टॅक्स अधिकाऱ्यांचा लूक करतात. त्यानंतर ते भारत गणेशपुरे यांच्या घरात धाड टाकतात. सध्या त्यांच्या एन्ट्रीचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Bharat Ganeshpure New Serial|
दरम्यान, भारत गणेशपुरे यांची या मालिकेत नकारात्मक भूमिका असणार आहे. यात ते राजकीय व्यक्ती म्हणून दाखवण्यात आले आहेत. शिवा ज्या भागात राहते, तिथले ते नगरसेवक आहेत. आता या नव्या रूपात भारत गणेशपुरे यांना पाहण्यासाठी चाहते देखील आतुर झाले आहेत.
हेही वाचा:
शुभंकर-अमृताच्या लग्नात पुणेरी थाट; सुंदर लुकने वेधलं साऱ्यांचे लक्ष