Shubhankar Ekbote And Amruta Bane| यंदाच्या वर्षी मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार विवाह बंधनात अडकले. शिवानी सुर्वे- अजिंक्य ननावरे, तितिक्षा तावडे- सिद्धार्थ बोडके यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यानंतर आता अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने हे कलाकार देखील 21 एप्रिल 2024 ला लग्नबंधनात अडकले. सध्या त्यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या विवाहसोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
सन मराठीवर कन्यादान या मालिकेत दोघे एकत्र झळकले होते. यात वृंदा आणि राणाची भूमिका साकारून अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने लोकप्रिय झाले. मालिकेत या दोघांची जोडी फार पसंत केली गेली. ली. या मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. आता या दोघांनी खऱ्या आयुष्यातही विवाह गाठ बांधली. Shubhankar Ekbote And Amruta Bane|
अमृताने लग्नात गुलाबी रंगाची नऊवारी, तिला मॅचिंग जांभळ्या रंगाचा डिझायनर ब्लाउज, केसांचा सुंदर खोपा आणि मराठमोळे दागिने तिने लग्नात घातले होते. तर शुभंकरने तिच्या साडीला मॅचिंग व्हाईट कुर्ता आणि जांभळ्या रंगाचा दुपट्टा, पुणेरी पगडी असा पोशाख त्याने केला होता. दोघांच्या लुकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले होते. शुभंकर आणि अमृताच्या लग्नात पुणेरी थाट पाहायला मिळाला. Shubhankar Ekbote And Amruta Bane|
त्यांच्या मेहंदी, संगीत आणि हळदी समारंभाने सोशल मीडियावर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान, शुभंकर हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवत शुभंकरनेही मराठी सिनेइंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली. लवकरच तो विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या सिनेमात काम करणार आहे. याबाबतचे काही पोस्ट देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
हेही वाचा:
तिसऱ्या टप्प्यातील ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध; ‘या’ मतदार संघात सर्वात जास्त उमेदवार