चाकण रस्त्यावर चाकूच्या धाकाने महिलेला लुटले

शिक्रापूर- शिरूर तालुक्‍यातील शिक्रापूर येथे मागील महिन्यात दोघांना हत्याराच्या धाकाने लुटल्याची घटना ताजी असतानाच आता चाकण रस्त्यावर एका महिलेला चाकूच्या धाकाने लुटले. याबाबत स्निग्धा टंकधरा साहू (रा. राधाकृष्णनगर, मोशी टोलनाक्‍याजवळ, ता. हवेली, मूळ रा. देऊलासाही भापूर रोड, ओडिसा) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

लुटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. येथील चाकण चौकामध्ये स्निग्धा साहू ही महिला उभी असताना एक अनोळखी इसम पांढऱ्या रंगाची कार घेऊन त्या ठिकाणी आला. महिलेला किदर जाना है, बैठो गाडी में, असे म्हणाला. त्यावेळी महिलेने नकार दिला असताना त्या कार चालकाने महिलेला चाकू दाखवून जबरदस्तीने कारमध्ये बसण्यास सांगितले. त्यांनतर कार चाकण रस्त्याने घेऊन जात काही अंतर गेल्यानंतर महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेत पोबारा केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.