मंचर- अवसरी बुद्रुक-हिंगेवस्ती (ता. आंबेगाव) येथील गण्या डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्यास असलेले मेंढपाळ अनंता खंडु दगडे यांच्या घोड्यावर गुरुवारी (दि. 19) पहाटे बिबट्याने हल्ला करुन ठार केले. यामध्ये मेंढपाळ दगडे यांचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी अनंता दगडे यांच्या घोड्याची दोन शिंगरे बिबट्याने ठार केली होती. मेंढपाळ अनंता दगडे यांचा वाडा मंचर-शिरुर रस्त्यालगत अवसरी बुद्रुक गावच्या हद्दीतील हिंगेवस्ती गण्या डोंगराजवळ वास्तव्यास आहे. गुरुवारी पहाटे बिबट्याने घोड्यावर हल्ला करुन ठार केले. वनरक्षक शितल शिंदे यांनी पंचनामा केला आहे. यावेळी सरपंच पवनकुमार हुले, पोलीस पाटील माधुरी जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सर्जेराव हिंगे पाटील उपस्थित होते. पंधरा भिगावस्तीवर गेल्या दोन महिन्यांपासून दोन ते तीन बिबटे उसाच्या शेतात वास्तव्यास आहेत. बिबट्याने 6 ते 7 शेळ्या आणि वासरांवर हल्ला केला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थ कल्याण हिंगे पाटील आणि राजू भोर यांनी केली आहे.