पुणे – निकाल झाल्यानंतर त्याची प्रमाणित प्रत (सर्टिफाईड कॉपी) मिळण्यासाठी महारेरामधील पक्षकारांना करावी लागणारी कसरत आता थांबणार आहे. दाव्यावर निकाल सुनावल्यानंतर त्याची प्रत पक्षकारांना आता पोस्टाने पाठवली जाणार आहे.
पूर्वी प्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागत होता. त्याचा मेल आल्यानंतर त्यात असलेल्या तारखेला रेरामध्ये जाऊन प्रत घ्यावी लागत होती. मात्र, करोना पार्श्वभूमीवर बाहेर पडून ती घेणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्या पोस्ट किंवा कुरिअरने पाठवावे, अशी मागणी रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशन केली होती.
निकालावर कोणाला अपील करायचे असेल, तर त्यासाठी प्रमाणित प्रत गरजेची असते. पण ती प्रत्यक्ष रेरात जाऊन घेणे गैरसोयीचे ठरत होतो. त्यामुळे पोस्टाची सुविधा पक्षकार आणि वकिलांच्या दृष्टीने अत्यंत चांगली आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नीलेश बोराटे यांनी दिली.